होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sunetra Pawar : मुख्यमंत्री फडणवीसांकडे अर्थ खातं, सुनेत्रा पवारांना मिळाली ‘ही’ तीन खाती

On: January 31, 2026 7:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (३१ जानेवारी) राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे क्रीडा-युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक ही खाती देण्यात आली आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते कायम ठेवले आहे.

सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (३१ जानेवारी) मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला यांची होती उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि इतर नेते सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment