होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

JMC Election : मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या जळगावात भव्य रोड शो,‘या’ मार्गांवरून होणार मार्गक्रमण!

On: January 5, 2026 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Devendra Fadnavis News : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली असून, मंगळवारी, दि. ६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा भव्य रोड शो हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दुपारी ३ वाजता सुरू होऊन नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे त्याचा समारोप होणार आहे.

यात महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहे. या रोड शोबाबत मोठी व्यापारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्सुकता असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment