होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NCP Merger : विलीनीकरणावर पडदा उचलणार? शरद पवार गट घेणार पत्रकार परिषद

On: February 3, 2026 8:23 PM
Follow Us:
---Advertisement---

NCP Merger : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून जोरदार चर्चा रंगली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हा विषय अधिकच चर्चेला आला असून, शरद पवार गटाकडून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरु होत्या, असा दावा केला जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांतील युती हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. आता या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार गटाकडून सविस्तर इतिवृत्त मांडण्याची तयारी सुरु झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबत नेमकं काय घडलं, याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. ९ फेब्रुवारीनंतर शरद पवार गटातील प्रमुख नेते पत्रकार परिषद घेणार असून, यामध्ये बैठकीतील व्हिडिओ चित्रीकरणासह टप्प्याटप्याने माहिती दिली जाणार आहे.

शपथविधीच्या वेळी नेमकं काय ठरलं होतं, तसेच पक्ष एकत्र आल्यानंतर पुढील राजकीय दिशा काय असणार होती, यावरही प्रकाश टाकला जाणार आहे.

१७ जानेवारी २०२६ रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात असताना, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावत, बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांतील चर्चा झाल्याचे सांगितले.

मात्र, शरद पवार यांनी अजित दादाने १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु दुर्दैवाने त्याआधीच ते आपल्यापासून दूर गेले, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खबल उडाली आहे. त्यामुळे येणारी पत्रकार परिषद अनेक मोठे राजकीय गौप्य्स्फोट करणार, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment