Shetkari Karj Mafi 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफी संदर्भात ही आपडेट आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबतचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला जाईल, अशी महत्त्वाची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे एकत्रितपणे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, असे कृषिमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. दत्तात्रय भरणे यांनी कलम 260 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम असल्याचे सांगितले.
तसेच समिती राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची परिस्थिती, कर्जरचनेचे स्वरूप, बँकांचा सहभाग आणि शेतीसमोरील वाढते आव्हान राज्यातील शेती हवामानातील अनिश्चिततेमुळे अधिकच जोखमीची बनली आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांसोबतच कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना बाजारभाव मात्र स्थिर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ कर्जमाफी न करता दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याचे देखील भरणे यांनी स्पष्ट केले. आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करत आहे. अहवालाच्या आधारे व्यवहार्य आणि टिकाऊ निर्णय घेतला जाईल, असेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.










