Team India : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मात्र, अशात टीम इंडियाचे चार प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. कोणते चार प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत, हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला. त्याला साईड स्ट्रेन झाला, ज्यामुळे तो उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
ऋषभ पंत बाहेर
टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतदेखील न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. शुक्रवारी सराव करताना त्याला दुखापत झाली. पंतला कंबरेवर चेंडू लागला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे.
तिलक वर्माची दुखापत
फलंदाज तिलक वर्मालाही दुखापत झाली आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्याच्या पोटाच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचे पहिले तीन टी-२० सामने खेळू शकणार नाही.
सरफराज खानचा बोट तुटला
विजय हजारे ट्रॉफी दरम्यान सरफराज खानलाही दुखापत झाली होती. त्याचा बोट तुटला असून, त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले आहे. या दुखापतीमुळे तो विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमधूनही बाहेर पडला आहे.









