Gold-Silver Rate Today: सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोने-चांदीच्या किंमतीवर अमेरीका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोने-चांदीच्या किमतीत आज अचानक कमालीची घट झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांआधी मोठी वाढ झाली होती. मात्र, आज चित्र वेगळे असून भाव कमी झाले आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं 1,70,000 रुपये, तर चांदी 2,95,000 रुपयांवर जाऊन पोहोचली असताना आज अचानक सोनं आणि चांदीचा दर कमी झाला आहे. सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन सोने 1,60,000 रुपये आणि चांदी 2,26,000 हजार रुपयांच्या खाली आली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमिवर शेअर बाजार कोसळला होता. असे असल्याने सोने चांदीचे दर वाढतील असे वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात तशी वाढ देखील होत होती. मात्र, यावेळी मात्र शेअर बाजारसह ,सोने-चांदीचे दर ही घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे अमेरिकेला अपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे अमेरिकन फेडरल बँका आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय बदलणार असल्याचे चिन्ह आहे. अशात वाढत्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार बँकेत गुंतवणूक करण्याची शक्याता लक्षात घेता सोने-चांदीची मागणी घटली आहे. याचा परिणाम थेट सोने-चांदीच्या किंमतीवर दिसून आला. असे असले तरी युद्धाची तिव्रता वाढल्यास सोने-चांदीचे दर पुन्हा गगणाला भिडणार अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.











