PM Kisan 22th Installment: पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शेतकऱयांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. या योजनेत राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र असून हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर (PM Kisan Installment) महिन्यात वाटप होणार आहे.सुमारे चार वर्षा नंतर आता २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेषताः या हप्त्याचे वितरण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या अहिल्यानगर जिल्हा येथील असून, या जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत २१ वा हप्ता १९ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता. तसंच २२ व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी देणार अशी चर्चा होती; मात्र हा मुहूर्त साधता आला नाही.
२१ व्या हप्त्यात राज्यातील सुमारे ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले होते. आता २२ व्या हप्त्यासाठी ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले असून, यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाख २ हजार ५९० शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत निधी लवकरच वितररीत होणार असल्याची चर्चा होती. त्याअनुषंगाने मुख्य कार्यक्रम आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी (१३) रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
दरम्यान, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता यापूर्वी जानेवारीअखेर वितरित केला जाणारा होता, मात्र प्रत्यक्षात हा हप्ता देण्यात विलंब झाला. देशातील काही राज्यात निवडणुका असून त्यात आसाम, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या हप्त्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली









