Heat Wave Alert: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमाणात वाढ जाणवत आहे. त्यात जळगाव शहरासह जिल्ह्याचा पारा झपाट्याने वाढत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 40 अंशच्या जवळ पोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. वाढत्या तापमाणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेताला आहे. या निर्णानुसार, शाळांच्या वेळेत बदल करण्याचा आला आहे.
जि.प. शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 9 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहे. हा निर्णय सीबीएससी शाळा वगळता सर्व इंगजी माध्यमाच्या शाळांसाठीही लागू असेल.
दरवर्षी तापमाणाच्या बाबतीत जळगाव जिल्हा कायम चर्चेत असतो. नागपूरनंतर सर्वात जास्त तापमाणाची नोंद जळगावात होते. अशात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाचा जिल्ह्याचा पारा सातत्याने चढत असून उष्णतेचा त्रास वाढला आहे. वाढत्या तापमणात उष्माघाताचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबबात शिक्षक संघटनांनी देखील मागणी केली होती. या मागणीचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून हा मधला मार्ग काढण्यात आला आहे. मात्र, ज्या शाळा आधीच दोन सत्रांमध्ये सुरू आहेत, त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जात असल्या तरी माध्यमिक शाळा संहिता नियम 54.2 नुसार शिकवण्याचे तास कमी होणार नाही. नियमानुसार, दररोज किमान चार तास प्रत्यक्ष अध्यापन अनिवार्य राहील.









