Jalgaon Gold-Silver Rates : जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अर्थात सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी जीएसटीसह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचली आहे.
अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹१,४५,८४० रुपयांवर, तर २२ कॅरेट सोने ₹१,३३,७०० आणि १८ कॅरेट सोने ₹१,०९,४२० रुपयांवर आहे.
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोने ₹१,४५,६९० ला, २२ कॅरेट सोने ₹१,३३,५५० ला आणि १८ कॅरेट सोने ₹१,०९,२७० ला प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये सोने सर्वात महाग राहिले आहे, जिथे २४ कॅरेट सोने १,४६,७३० रुपये, २२ कॅरेट सोने १,३४,५०० रुपये आणि १८ कॅरेट सोने १,१२,३०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.










