Stock Market Crash Today: अमेरीका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका संपुर्ण जगाला बसत आहे. पश्चिम आशियातील या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम उमटू लागले आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळाले. आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifty मध्येही 525 अंकांची मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सत्रादरम्यान ही घसरण अधिकच वाढली असून, सध्या सेन्सेक्स 2400 हून अधिक, तर निफ्टी 750 हून अधिक अंकांनी खाली व्यापार करत आहे.
आशियातील प्रमुख बाजारांची स्थिती
या युद्धाचा फटका फक्त भारतालाच बसत आहे असे नव्हे, तर संपूर्ण आशियाई आणि जागतिक बाजार देखील यामुळे प्रभावित झाले आहे. यात..
Japan Market: 7% घसरण
South Korea: 8% घसरण
Australia: 4% घसरण
Singapore: 3% घसरण
US Market: अमेरिकन बाजारातही मोठ्या घसरणीचे संकेत
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ
युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होत कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. दर 114 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. इंधनाचे वाढते दर भारतासारख्या आयातदार देशासाठी महागाई वाढवणारे ठरण्याची शक्यता आहे. अशात पश्चिम आशियातील या परिस्थितीवर भारत सरकारचे बारीक लक्ष आहे.









