होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

On: March 5, 2026 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीत जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहेत. या वाहनांपैकी अनेक वाहनमालकांनी शासकीय दंडाची रक्कम तहसील कार्यालयात भरणा केलेली नसल्याने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्याअनुषंगाने एकूण 34 वाहनांचा जाहीर लिलाव 12 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे जाहीर बोली पद्धतीने करण्यात येणार आहे. लिलावासाठी असलेल्या वाहनांची सविस्तर माहिती, हातची किंमत, दंडाची रक्कम तसेच लिलावाच्या सर्व अटी व शर्ती तहसील कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर तसेच प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

तसेच, लिलावात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त जे वाहन प्रशासकीय इमारत आवार किंवा इतर ठिकाणी जप्त आहेत व ज्या वाहनांचे क्रमांक किंवा चेसीस नंबर यात तफावत आहे अशाप्रकारच्या वाहनांना भंगार मध्ये देऊन दंडात्मक रकमेची वसुली केली जाईल याची सर्व वाहन चालक (वाहनमालक यांनी नोंद घ्यावी, असेही तहसीलदार शितल राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment