होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मनपाचे 1452 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर; आर्थिक उत्पन्न वाढीवर दिला भर

On: March 11, 2026 1:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यावेळी 1452 कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यावर समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

मनपा निवडणुकीनंतर महापालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे गायकवाड, नगरसचिव सतीश शुक्ला हे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सन 2025-26 चे सुधारीत आणि सन 2026-27 चे मुळ अंदाजपत्रक सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सादर केले. अंदाजपत्रकातील तरतुदी, जमा-खर्च यासंबंधीच्या विषयावर आयुक्त ढेरे यांनी सभागृहात निवेदन सादर केले. मालमत्ता करापासून सन 2025-26 मध्ये रक्कम रू. 118 कोटी इतके सुधारित उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले असून, शहरातील मालमत्तांचे वार्षिक भाडे मूल्य निर्धारणांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मनपाचे उत्पन्नात साधारणपणे 5 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

या अपेक्षित वाढीसह सन 2026-27 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून 124 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे. तसेच अतिशय जुनी व जीर्ण झालेली प्रभाग समिती क्र. 3 व 4 चे कार्यालय नुतनीकरणासाठी नवीन ईमारत उभारण्याचे नियोजन केलेले आहे. जळगाव महानगरपालिकेचा गाळेसंदर्भातील प्रस्ताव अन्वये 2 व 3 टक्केप्रमाणे आकारणी करण्याबाबत शासनास मंजुरीकरिता पाठविण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नापैकी व्यापारी संकुलातील गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्न ही प्रमुख बाब आहे. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत मनपा मालकीच्या जागेवर एकूण 92 जागांवर जाहिरात बॅनर, फलक प्रदर्शित करणेकामी स्ट्रक्चर उभारून सदर जागेवर जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता अभिकर्त्याची नेमणूक करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यातुन मनपासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे.

महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांकडून लायसन्स फी, परवाना फी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील व्यवसायिकांना विहित शुल्क आकारून, व्यवसाय परवाना देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण या विभागासाठी अंदाज पत्रकात रक्कम रु. 2 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतुद सुचविण्यात आली. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण या घटकांसाठी आवश्यकतेप्रमाणे मागील वर्षामधील अखर्चीत तरतुद उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जळगाव महानगरपालिकेतर्फे लवकरच शहराकरिता ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजन असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर शहरातील मार्ग निश्चीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. या बैठकीला नगरसेवक नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, नितीन सपके, मानसी भोईटे, कल्पेश सोनवणे, सुरेश सोनवणे, वंदना इंगळे, अरविंद देशमुख, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे, सागर सोनवणे, ॲड. दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, इब्राहिम पटेल हे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment