Kalpita Patil : राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) महिला काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांचे याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
कल्पिता पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली. त्यांनी विविध पदांवर जबाबदारीने काम करत पक्षसंघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या.
2013 मध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत गावविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम केले. 2016 मध्ये दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत भारतातील 5 व्यक्तींची निवड झाली होती, त्यात कल्पिता पाटील यांचा सहभाग होता.
या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









