PM Viksit Bharat Rojgar Yojana : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी नवीन ”प्रधानमंत्री विकसित भारत योजना” सुरू केली. पंरतु, अद्यापही ग्रामीण भागातील काही तरुणांना या योजनेबाबत अधिक माहिती नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
सरकारकडून वेगवेगळ्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन देशभरात विविध योजना राबविल्या जातात. अशात सरकारने तरुणांसाठी प्रधानमंत्री विकास भारत योजना (PMVBY) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत, सरकारने ३५ दशलक्ष तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘या’ योजनेचे नियम काय आहेत?
या योजनेअंतर्गत सर्व तरुण आर्थिक लाभांसाठी पात्र राहणार नाहीत. ही योजना विशेषतः पहिल्यांदाच काम करणाऱ्या तरुणांना लाभ देईल. शिवाय, फक्त EPFO मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळतील. सरकार या तरुणांना दोन हप्त्यांमध्ये १५,००० प्रदान करेल.
दरमहा कमाल १००,००० पर्यंत वेतन असलेले लोक लाभांसाठी पात्र असतील. सहा महिन्यांच्या नोकरीनंतर सरकार पहिला हप्ता आणि १२ महिन्यांनंतर दुसरा हप्ता पाठवेल. अर्थात सरकार दोन हप्त्यांमध्ये तरुणांना १५,००० रुपये प्रदान करेल.





