होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

LPG Gas Shortage: मोठी बातमी! सरकारने व्यावसायिक LPG चा पुरवठा थांबवला, देशातील हॉटेल इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

On: March 7, 2026 1:07 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Gas Shortage: अमेरीका, इस्रायल- इराण संघर्षाचे पडसाद आता भारतातही जाणवू लागले आहे. या युद्धाचा परिणाम थेट एलपीजी (LPG) पुरवठ्यावर झाला आहे. अशात केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

या युद्धाचे पडसाद संपुर्ण जगावर पडायला सुरुवात झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या एलपीजी टँकरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारताला याचा मोठा फटका बसत आहे. कारण भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे. सध्या युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय संकटात

व्यवसायिक एलपीजी पुरवठा बंद करण्याच्या  निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर होत आहे. नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. युद्धाच्या कठीण परिस्थितीत आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत, मात्र एलपीजीवरील निर्बंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लागू करावेत, अशी संघटनेची भूमिका आहे. नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितले की, कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद राहिला तर पुढील चार ते पाच दिवसांत देशातील हॉटेल इंडस्ट्री बंद करण्याची वेळ येऊ शकते. हजारो छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय या गॅसवर अवलंबून असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते, अशीही त्यांनी भीती व्यक्त केली.

 

भारताकडे 30 दिवसांचा एलपीजी साठा

तेल कंपन्यांनी डीलर्सना पाठवलेल्या संदेशात स्पष्ट म्हटले आहे की, “युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा पुढील सूचनेपर्यंत थांबवण्यात येत आहे. कृपया सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत. परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल.” सध्या भारताकडे सुमारे 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशातील गॅस पुरवठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात घरगुती गॅस मिळण्यातही विलंब होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment