होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याकडून त्रास; मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं

On: March 7, 2026 5:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Nanded News: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या त्रासाला कंटाळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवतीने वसतिगृहातच गळफास घेतला. नांदेडच्या हडको परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध यांच्याविरोधात आत्महतेस प्रवृत्त केले आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात माहिती आशी की, मयत 25 वर्षिय विद्यार्थीनी होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. दरम्यान तिने वसतिगृहात आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर, मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी जीवन घोगरे यांनीच संबंधित विद्यार्थीनीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. मयत विद्यार्थिनीच्या पालकांच्या फिर्यादिवरुन जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवन घोगरे यांच्या वसतिगृहामध्ये आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थिनी राहत होती, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. त्यामुळेच, माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केली आहे. त्यानुसार, जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment