होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Nashik Accident News : ट्रॅव्हल्स-पिकअपचा भीषण अपघात, साखरझोपेत असलेले चौघे जागीच ठार

On: January 19, 2026 11:51 AM
Follow Us:
---Advertisement---

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मालेगाव–मनमाड महामार्गावर आज पहाटे हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. दुर्दैवी अशा या घटनेत चार जण जागीच ठार झाले आहे. तर 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहे. जखमींतील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.


ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली.

चौघांचा जागीच मृत्यू

मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात चार प्रवाशी जागीच ठार झाले. मृतांमध्ये मालेगाव येथील शेख अताऊर रहेमान शेख आबिद (वय 39, रा. इस्लामपुरा), सत्तार खान मोहम्मद खान (वय 39, रा. प्लॉट नं. 4, अमनपुरा) आणि याकुब शेरू खान (वय 27, रा. अमनपुरा) यांचा समावेश आहे. तर ट्रॅव्हल्स बसमधील मृत 26 वर्षीय तरुणाची ओळख पटलेली नाही.


अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करत खमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलविले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment