Pilot Job News : विमानाचा पायलट होण्याचे स्वप्न अनेकजण मनाशी बाळगून असतात. या क्षेत्राचं एक वेगळंच आकर्षण असतं. उड्डाण करण्याची, मोठ्या उंचीवर पोहोचण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची अनेकांची इच्छा असते. पण, पायलट होणं वाटतं तितकं सोपं नाही. पाठ्यपुस्तकांचा अभ्यास, कठोर प्रशिक्षण, हजारो तासांचे उड्डाणानंतर एक पायलट तयार होतो. पायलट बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांना अनेकदा या पदाच्या पगाराबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल उत्सुकता असते. तुम्हालादेखील पायलट होण्यासाठी अवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता निकष, आवश्यक अभ्यास, वैद्यकीय चाचण्या, प्रशिक्षण, अभ्यासक्रम खर्च आणि पगार काय असतो हे जाणून घेण्याची ईच्छा असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
काय आहे शैक्षणिक पात्रता
जर तुम्हाल पायलट व्हयचे असेल तर तुम्हाला शिक्षण आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण असावा. यासह विद्यार्थ्यांला भौतिकशास्त्र आणि गणितात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बारावीत गणित घेतले नसेल, तर तुम्ही ओपन बोर्डमधून गणित घेऊन पायलट बनू शकता.
12 वी नंतर असे होता येते पायलट
12 वी नंतर पायलट बनण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला म्हणजे फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश होणे, जिथे तुम्हाला ग्राउंड क्लासेस, फ्लाइंग ट्रेनिंग आणि DGCA परीक्षा एकाच वेळी देता येते. याव्यतिरिक्त, तुम्हाला प्रथम DGCA परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तुम्ही प्रथम DGCA लेखी परीक्षा देखील उत्तीर्ण करू शकता. यासाठी, तुम्ही वेगळ्या कोचिंग संस्थेत सामील होऊ शकता. नंतर, तुमचे उड्डाण तास पूर्ण करण्यासाठी तुम्ही फ्लाइंग स्कूलमध्ये सामील होऊ शकता.
पायलट होण्यासाठी येतो इतका खर्च
पायलट होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या पायलट प्रशिक्षण स्वस्त नाही. या पुर्ण प्रशिक्षणाचा एकूण खर्च 35 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत येऊ शकतो. हा खर्च फ्लाइंग स्कूल, देश, विमान आणि प्रशिक्षण पद्धतीवर अवलंबून असतो. तुम्ही भारतात किंवा परदेशात प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानुसार, प्रशिक्षणाचा खर्च ठरतो.
वैद्यकीय चाचणी असते महत्त्वाची
पायलट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी महत्त्वाची आहे. या वैद्यकीय चाचणीतून तुमची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती तपासली जाते. यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय वैद्यकीय चाचण्या घेते. पहिली क्लास-२ वैद्यकीय चाचणी असते. ही पहिली वैद्यकीय चाचणी असते. ती तुमची दृष्टी, रक्तदाब, हृदय गती, श्रवणशक्ती आणि मानसिक स्थितीचे मूल्यांकन करते. क्लास-2 उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही क्लास-1 वैद्यकीय चाचणी घेता. या वैद्यकीय चाचणीला साधारणपणे दोन दिवस लागतात. या चाचणीतून तुम्ही व्यावसायिक पायलट बनण्यास योग्य आहात की नाही हे निश्चित केले जाते.
इतका मिळतो पगार
एअरलाइन पायलट नोकऱ्या फक्त मुलाखतींपलीकडे जातात. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा (12 वी-स्तरीय भौतिकशास्त्र आणि गणित), हात-डोळा समन्वय चाचणी (व्हिडिओ गेमसारखी), मल्टीटास्किंग आणि समस्या सोडवण्याची चाचणी आणि समोरासमोर मुलाखत यांचा समावेश आहे. पायलटचे पगार खूप चांगले आहेत. त्याच्या फर्स्ट ऑफिसर (सह-पायलट) चा पगार दरमहा सुमारे 3 लाख रुपये असू शकतो, कॅप्टन पायलटला दरमहा 8 ते 10 लाख रुपये आणि अनुभवी पायलटला दरमहा 10 ते 15 लाख रुपये मिळू शकतात.











