वरणगाव (ता. भुसावळ) : तेलंगणा येथे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा पडसाद महाराष्ट्रही उमटला असून, वरणगाव येथील महात्मा फुले समता परिषदतर्फे या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील समाजकंटकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन वरणगाव पोलिस स्टेशनला देण्यात आले.
तेलंगणा राज्यातील संगापूर जिल्ह्यातील तेलापूर येथे काही समाजकंटकांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेचा पडसाद महाराष्ट्रही उमटत असून, येथील महात्मा फुले समता परिषदतर्फे या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महिला तालुका अध्यक्ष सविता माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, कृष्णा माळी, संदीप माळी, सरिता माळी, बबलु माळी, सुरेखा देशमुख आदी उपस्थित होते.
अपमानजनक कृत्यांना स्थान नाही – परिषद
महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व समजून त्यांच्या आदर्शांचा सन्मान करणे आवश्यक आहे. अशा अपमानजनक घटनांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे असून, समाजात ऐक्य आणि न्याय टिकवण्यासाठी प्रशासनाची तत्परता अपेक्षित असल्याचे परिषदने सांगितले.
(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)









