IND vs NZ T20 : बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अर्थात दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा यांच्या जागी रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आले आहे. विशेषतः दोन्ही खेळाडूंना दीर्घकाळानंतर टी२० संघात स्थान मिळाले आहेत.
वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर वैद्यकीय पथकाने काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या तीन टी२० सामन्यांमधून आधीच बाहेर आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी लेग-स्पिनर रवी बिश्नोई, तर तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरला टी२० संघात स्थान देण्यात आले आहे. विशेषतः श्रेयस अय्यर दोन वर्षांनी टी-२० संघात परतला आहे. त्याने शेवटचा टी-२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता.
दरम्यान, रवी बिश्नोईने फेब्रुवारी २०२५ पासून टीम इंडियासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे, ही मालिका दोन्ही खेळाडूंसाठी एक मोठी संधी ठरू शकते.
टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-२० सामने), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.











Massage
Massage new