होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

SBI Transaction Rules Changes : तर बसेल फटका, एसबीआयने बदलले नियम

On: January 17, 2026 1:38 PM
Follow Us:
---Advertisement---

SBI Transaction Rules Changes : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांच्या व्यवहार नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अर्थात, बँकेने IMPS (इन्स्टंट मनी ट्रान्सफर) वर नवीन शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारसह इतर बँकांच्या एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. दरम्यान, हे नवीन IMPS शुल्क १५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

डिजिटल चॅनेलद्वारे (इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि YONO अॅप) ₹२५,००० पर्यंतच्या IMPS हस्तांतरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, आता ₹२५,००० पेक्षा जास्त रकमेसाठी शुल्क लागू होईल, असेही बँकेने सांगिलते.

शाखेतून IMPS वापरणाऱ्यांसाठी दिलासा

SBI शाखेतून IMPS ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी कोणतेही नवीन बदल झालेले नाहीत. त्यामुळे शुल्क तेच राहणार आहेत.

या खात्यांवर कोणतेही नवीन शुल्क होणार नाही लागू


SBI ने काही प्रकारच्या पगार पॅकेजेस आणि बचत खात्यांना IMPS शुल्कातून सूट दिली आहे. यामध्ये DSP, PMSP, ICSP, CGSP, PSP, RSP खाती, शौर्य कुटुंब पेन्शन खाते आणि SBI रिश्ते कुटुंब बचत खाते यांचा समावेश आहे.

जास्त शुल्क कोणाला आकारले जाईल?

  • बचत खातेधारक: इतर बँकांच्या ATM मधून मोफत मर्यादेनंतर
  • रोख काढणे : ₹23 + GST
  • गैर-आर्थिक व्यवहार : ₹11 + GST
  • पगार खाती : पूर्वी, अमर्यादित मोफत व्यवहार होते, आता दरमहा फक्त 10 मोफत
  • व्यवहार चालू खाते: प्रत्येक व्यवहारावर वाढीव शुल्क लागू होईल.

कोणाला सूट दिली जाईल?

  • KCC खाते: इतर बँकांमध्ये अमर्यादित मोफत ATM
  • BSBD खाते: कोणताही बदल नाही
  • कार्डलेस रोख पैसे काढणे: SBI आणि इतर बँकांच्या ATM मधून मोफत

शुल्क कसे टाळायचे?

SBI ग्राहकांना अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी बँकेच्या 63,000 हून अधिक ATM आणि ADWM चा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला देत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment