होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sunetra Pawar Deputy Chief Minister : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ

On: January 31, 2026 5:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Sunetra Pawar Deputy Chief Minister :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. विशेषतः त्यांना राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.

मुंबईत आज शनिवारी (दि. ३१ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले. ज्यात पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात, तर दुसरा प्रस्ताव सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्याबाबत. या दोन्ही प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळाली.

यामुळे सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, त्यांना राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment