धरणगाव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन इंद्रधनुष्य 2025- 26 चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या खानदेशी अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण तर उद्घाटन प.रा.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक नीना पाटील, अजय पगारिया, प्राचार्य डॉ. उदय एस.जगताप, उपप्राचार्य डॉ.व्ही.ए.वारडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या प्रा. आर.पी.चौधरी, विद्यापीठाच्या आधीसभा सदस्या डॉ. के.डी.महाजन, IQAC समन्वयक प्रा.एस.एस.पालखे, पर्यवेक्षक प्रा. एस.आर.अत्तरदे, कार्यालयीन अधीक्षक रितेश साळुंखे, वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.स्वप्निल म.खरे, कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.एम.एस. कांडेलकर आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात महाविद्यालयाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2025- 26 चा अहवाल प्राचार्य डॉ.उदय एस.जगताप यांनी सादर केला. सूत्रसंचालन डॉ. गौरव जी. महाजन, प्रा. पी.सी.साळवे, डॉ.सुषमा तायडे, डॉ. नेत्रा उपाध्ये यांनी केले. प्रास्ताविक व आभार स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.स्वप्निल म.खरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.









