होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धरणगाव नगरपालिका स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

On: January 20, 2026 12:39 PM
Follow Us:
---Advertisement---

धरणगाव : नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा लीला सुरेश चौधरी यांच्यासह विविध विषय समित्यांच्या सभापती पदांवरही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी अमोल बडगुजर यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी आदी उपस्थित होते.

असे आहेत नवनिर्वाचित सभापती

यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती – किशोर दौलत कंखरे, शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती – प्रियंका चेतन जाधव, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती – नितीन गजानन बयस, पाणीपुरवठा व जननिस्सारण समिती – सुरेखा विजय महाजन, नियोजन व विकास समिती – हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल मोमीन, तर महिला व बालकल्याण समिती – मंदाकिनी ललित येवले यांची सभापतीपदी अधिकृतरीत्या बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याने नगरपरिषदेत एकोपा व सहकार्याचे वातावरण दिसून आले. नवनिर्वाचित सभापतींनी नगरविकासाला प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, नवनिर्वाचित सभापतींचे नगरसेवक, अधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. या बिनविरोध निवडीमुळे धरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा व गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment