जळगाव : गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा रविवारी (दि. १ फेब्रुवारी) येथील पद्मालय विश्रामगृहात विशेष पदग्रहण सोहळा पार पडला. यात संघटनेच्या विविध केंद्रीय, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री ता. धुळे येथील संघटनेच्या पदाधिकारी जोशीला पगारिया, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी, राजेश यावलकर आदी उपस्थित होते.

यांची एकमताने निवड
केंद्रीय कार्याध्यक्षपदी सागरभाऊ ओतारी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत पाटील, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल, सचिवपदी मंगल पाटील, जिल्हाध्यक्षपदी चेतन वाणी, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत सोनवणे, सुमित देशमुख, दीपक पवार, जिल्हा सचिवपदी वसीम खान, जिल्हा सहसचिवपदी राजेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत पाटील, खजिनदारपदी पंकज शेटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी विश्वजीत चौधरी, शहर अध्यक्षपदी जितेंद्र कोतवाल, शहर उपाध्यक्षपदी पवन खंबायत, शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद, सचिवपदी योगेश रमेश चौधरी, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे, संघटकपदी राकेश विजय वाणी, नितीन पुंडलिक सोनवणे, निखिल अशोक मोरे, शहर खजिनदार म्हणून गोकुळ सोनार, शहर संघटकपदी भूषण हंसकर, सहसंघटकपदी राजेंद्र रामराव पाटील तसेच सदस्य म्हणून इकबाल पटेल यांची निवड करण्यात आली.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकेत अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य स्पष्ट करून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, चंद्रकांत यादव, राजेश यावलकर, जोशीला पगारिया, रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा निर्धार
पत्रकारांच्या समस्येसह पाल्यांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मांडले. कार्यक्रम यश्वीतेसाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
केंद्रीय कार्याध्यक्षपदी सागरभाऊ ओतारी यांची निवड
दै. शौर्य मराठीचे मुख्य संपादक सागरभाऊ ओतारी यांची केंद्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचा जनसंपर्क, संघटनात्मक कौशल्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांची जाण असल्याने ही निवड करण्यात आली. या निवडबद्दल, सागरभाऊ ओतारी यांनी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यभर विस्तार करत पत्रकारांच्या समस्या सोडवत, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही दिली.

बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगावनंतर आता नाशिक, पुणे, मुंबई यासह राज्यभरात संघटनेचा विस्तार होणार असून, दर महिन्यात बैठक घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या संघटनेच्या बैठकीस जळगाव जिल्ह्याभरासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.









