होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

PM-Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 22व्या हप्त्यात थेट 4 हजार मिळ… 

On: February 5, 2026 3:47 PM
Follow Us:
---Advertisement---

PM-Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. आता या योजनेतील 22 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर अली आहे. अर्थात काही शेतकऱ्यांना थेट 4 हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधी 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा करण्यात आला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी अपूर्ण असणे वा अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे हा हप्ता मिळू शकला नव्हता. अशा शेतकऱयांनी नंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि अर्जातील चुका दुरुस्त केल्या असल्यास, त्यांना 21वा आणि 22वा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

होळीच्या आधीच जमा होण्याची शक्यता

सूत्रांनुसार, यंदाचा 22वा हप्ता होळी सणाच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच 4 मार्च 2026 पूर्वी ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही वा त्यांचा अर्ज प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना यावेळीही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून अर्जातील त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment