होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दुर्दैवी! दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, हळदीचा कार्यक्रम आटोपून निघाले अन् काळाने हेरले…

On: February 7, 2026 4:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Accident : हळदीचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतताना, भरधाव कार अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर झाले. हा अपघात पाचोरा–जळगाव रस्त्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. श्रीरंग सुरेश पाटील, प्रसन्न रवींद्र निमजे (दोघे रा. पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणांचे नाव आहे.

जळगावच्या पिंप्राळातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोराच्या आसनखेडा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावच्या दिशेने परतताना, पाचोरा-जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ भरधाव कार अनियंत्रित होऊन पलटी झाली.

या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला आदळली. यात श्रीरंग पाटील, प्रसन्न निमजे दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत, जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

मृत श्रीरंग पाटील याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर खांद्यावर होती. मात्र, अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment