होम महाराष्ट्र राजकरण खान्देश जळगाव जिल्हा देश क्रीडा आरोग्य रोजगार राशीभविष्य सरकारी योजना

Breaking
---Advertisement---

जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्या मतदान, जाणून घ्या किती वाजता होईल सुरुवात…

On: January 14, 2026 7:06 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, आज निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी (दि. १५ जानेवारी) रोजी मतदान, तर शुक्रवारी ( दि. १६ जानेवारी) रोजी दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.


निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणीसाठी ६ विभागांमध्ये विभागणी केली असून एकूण १४ टेबलवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.

पहिल्या विभागात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ ची मतमोजणी होणार असून प्रत्येकी ६ राऊंड होतील. दुसऱ्या विभागात प्रभाग क्रमांक ४ चे ६ राऊंड, तर प्रभाग ५ आणि ६ चे प्रत्येकी ७ राऊंड होतील. तिसऱ्या विभागात प्रभाग ७ चे ६ राऊंड, तर प्रभाग ११ आणि १२ चे प्रत्येकी ७ राऊंड नियोजित आहेत. चौथ्या विभागाच्या नियोजनानुसार प्रभाग १३ चे ७ राऊंड होतील, तर प्रभाग १४, १८ आणि १९ चे प्रत्येकी ५ राऊंड पार पडणार आहेत.

पाचव्या विभागात प्रभाग १५, १६ आणि १७ या तिन्ही प्रभागांचे प्रत्येकी ६ राऊंड होतील. सहाव्या विभागात प्रभाग ८ चे ८ राऊंड, प्रभाग ९ चे ९ राऊंड आणि प्रभाग १० चे एकूण ७ राऊंड होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुरुवार, दि. १५ सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल तर सायंकाळी ५.३० वाजता मतदान बंद होईल. मात्र, साहित्याच्या वेळी जे मतदार रांगेत असतील, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यानंतर मतदानानंतर सर्व यंत्रे सीलबंद करून वखार महामंडळातील स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येतील, अशी माहितीही आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

दुपारी २ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता…

शुक्रवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४ टेबल लावण्यात आले आहेत. सर्वात आधी टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मोजणी सुरू होईल. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांना जागीच प्रमाणपत्र दिले जाईल. जे उमेदवार गैरहजर असतील, त्यांना महापालिकेतून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

५१६ केंद्रांवर ३,५५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती…

मतदानासाठी ५१६ केंद्र असून यात १ पिंक बूथ (महिला संचलित), २ दिव्यांग केंद्र आणि १२ आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी ३,५५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यात २०० महिला कर्मचारी आणि ५२ क्षेत्रीय अधिकारी, ५१६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उद्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडावून क्रमांक १४ व १७ येथून निवडणूक साहित्याचे वाटप होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment