होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

World Cancer Day 2026 : कर्करोग कसा होतो? जाणून घ्या कारणे अन् लक्षणे

On: February 4, 2026 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

World Cancer Day 2026 :  कर्करोग हा आज केवळ मानसिक वा वैद्यकीय समस्या न राहता संपूर्ण समाजासाठी उभे राहिलेले एक मोठे आरोग्यविषयक आव्हान बनले आहे. बदलती जीवनशैली, चुकीच्या सवयी आणि वाढता ताणतणावामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे.  आज, ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्करोग नेमका कसा होतो, त्याची लक्षणे काय आणि योग्य उपचारांद्वारे मात करणे शक्य आहे का? जाणून घेऊया.

कर्करोगाची प्रमुख कारणे

तंबाखूचे सेवन, धूम्रपान, असंतुलित आहार, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अतिमद्यपान, प्रदूषण आणि दीर्घकालीन ताणतणाव ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. तसेच काही विषाणूजन्य संसर्गांमुळेही कर्करोगाचा धोका वाढतो. एचपीव्हीमुळे गर्भाशय ग्रीवेचा, तर हिपॅटायटीस बी व सी मुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

अचानक वजन घटणे, सतत थकवा, शरीरात कुठेही गाठ निर्माण होणे, दीर्घकाळ खोखला, जखम न भरणे, आवाजात बदल वा रक्तस्राव या सारखी लक्षणे आढळल्यास तत्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कर्करोगावर मात शक्य आहे का?

कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास योग्य उपचारांद्वारे या आजारावर मात करणे शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि इम्युनोथेरपीसारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, तंबाखू व मद्यपान टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणत कमी करता येतो.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.) 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment