होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Beed Crime: मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

On: April 8, 2026 3:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Beed News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्याच्या नैराश्यातून एका 24 वर्षिय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाने राहत्या घरी विष प्राशन करुन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला डावलण्यात आल्याने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता. त्यातूनच, त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

महेश उद्धव भणगे असे मयत तरुणाचे नाव असून, त्याने घराच्या छतावर पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

आत्महत्येपुर्वी मोबाईलवर स्टेटस

 

गेल्या सोमवारी 6 एप्रिल रोजी महेशच्या एका मित्राचा वाढदिवस होता. महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे तो स्वतःला सावरू शकला नाही आणि तो नैराश्येत गेला होता. त्यातुनच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. महेशने आत्महत्येपुर्वी आपल्या मोबाईलवर “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. महेशच्या जाण्याने कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment