Donald Trump Visit India: आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी, मी लवकरच भारतात येणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. तसा खास संदेश पंतप्रधान मोदींसाठी दिला आहे. प्रलंबित असलेला अमेरिका आणि भारतामधील व्यापार कराराच्या चर्चेसाठी सातत्याने दोन्ही देशाचे प्रतिनिधी संपर्कांत आहे. अखेर भारत-अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची अंतरिम सहमती झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. सातत्याने भारताविषयी गरळ ओकणारे ट्रम्प अचानक नरमल्याचे दिसून येत आहे. त्यामागे व्यापार करार असल्याची चर्चा आहे. भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतला आहे.
भारत आपली तेलाची गरज भागवण्यासाठी विविध देशांकडून आयात करत आहे. ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं, असंही सांगितले आहे. तसेच भारत पाकिस्तान युद्ध रोखण्याचे क्रेडिट देखील ट्रम्प यांनी घेतले तसेच भारताने त्यांचे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले तरी अनेक आंतराष्ट्रीय मंचावर त्यांनी श्रेय घेतले. त्याचा परिमाण अमेरिका आणि भारत यांच्यात संबंध ताणले गेले होते. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प हे एका मंचावर अलीकडे दिसले नाही. मात्र आता अमेरिका आणि भारत व्यापार करारावर सहमती होताच ट्रम्प नरमल्याची चर्चा आहे. परंतु भारताला अमेरिकेच्या मागील काळातील वर्तवणूक लक्षात घेता ताक ही फुंकून प्यावे लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला असल्याचं लॉरा लूमर यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये सांगितले. लूमर यांनी यावेळी ट्रम्प यांचा संदेश वाचून सांगितला.










