होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्टील, काच की तांबे? कोणत्या भांड्यातील पाणी आरोग्यवर्धक, जाणून घ्या!

On: March 13, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Drinking Water Tips: शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, पाणी पितांना कोणत्या भांड्यात प्यावे हे बहुतेकदा अनेक लोकांना माहिती नाही. त्याकडे फारसे लक्ष देत नाही. तांबे स्टील किंवा काचेची व तांब्याची भांडी शक्यतो आपल्या घरांमध्ये वापरले जातात. प्रत्येक भांड्याचे स्वतःचे वैशिष्ट्य असते, म्हणून यापैकी कोणते भांडे पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात पोषक व महत्वाचा घटक आहे. अनेकदा लोक पिण्यासाठी सर्वोत्तम भांडे निवडण्याला फारसे ,महत्व देता नाही. असे करणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. वेगवेगळ्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी त्याच्या वेगळ्या गुणधर्मासाठी ओळखले जाते, त्याचे वेगळेपण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. स्टील, काच आणि तांब्याची भांडी सामान्यतः घरांमध्ये वापरली जातात, कोणते भांडे सुरक्षित आणि पिण्यासाठी योग्य आहे, हे समजून घेणे महत्वाचे आहे.

स्टीलचे भांडे

सध्या घरांमध्ये काही प्रमाणात का होईना बहुतेक लोक स्टेनलेस स्टीलचे ग्लास आणि बाटल्या वापरतात. स्टील मजबूत असते आणि गंजण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे स्टीलमध्ये हानिकारक रासायान नसल्याने पाण्याचा नैसर्गिकपणा कायम राहतो. ज्यामुळे ते दैनंदिन वापरासाठी सुरक्षित होते. तसेच स्टीलची भांडी स्वच्छ करणे सोपे असून योग्यरित्या धुतल्यावर त्यात किटाणू असण्याची शक्यता फारच कमी असते.

काचेचे ग्लास

पिण्याच्या पाण्यासाठी काच हा देखील एक चांगला पर्याय आहे. काच ही एक तटस्थ सामग्री आहे, म्हणून त्यात साठवलेले पाणी त्याची मूळ चव आणि गुणवत्ता तशीच राखते. अनेक आरोग्य तज्ञांचा सल्ल्यानुसार, काचेच्या ग्लासमधून पाणी पिल्याने त्याची चव अधिक शुद्ध होते. तसेच काचेचे भांडे नाजूक असतात आणि ते खाली पडल्यास तुटू शकतात, म्हणून त्यांना काळजीपूर्वक हाताळणे महत्वाचे आहे.

तांब्याची भांडी

तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिणे ही भारतात दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. तांब्यामध्ये सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे पाण्यात असलेले काही बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात ६ ते ८ तास साठवल्यानंतर पाणी पिणे चांगले मानले जाते. तसेच सातत्याने सेवन करणे चांगले आले तरी त्याचे प्रमाण कमी असावे असे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जास्त प्रमाणात ते सेवन करू नये.

कोणते भांडे सर्वोत्तम?

एकंदरीत स्टील आणि काच दोन्ही पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित पर्याय असले तरी तांब्याच्या भांड्यातून पाणी देखील फायदेशीर असू शकते, परंतु त्याच प्रमाण संतुलित असणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही पाणी साठवता ते भांडे नेहमी स्वच्छ ठेवा. स्वच्छ भांडे आणि शुद्ध पाणी शरीराला योग्यरीत्या हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment