होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

LPG Gas Shortage: नाशिकमध्ये घरगुती गॅस पुरवठा सुरळीत, मात्र उद्योग क्षेत्र चिंतेत!

On: March 12, 2026 5:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News : युद्धाचा फटका आता हळूहळू महानगरांना ही बसत आहे, नाशिक शहरात ही गॅस सिलेंडरच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. घरगुती गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती प्रत्यक्ष तुटवड्यामुळे नसून अचानक वाढलेल्या मागणीचा परिणाम असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उद्योग क्षेत्रात मात्र लघु मध्यम उद्योग बंद करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. ही स्थिती अशीच राहील्यास मोठ्या उद्योगांनाही गॅस टंचाईमुळे सुट्या भागांअभावी उत्पादन बंद करावे लागण्याची शक्यता उद्योग वर्तुळात वर्तवली जात आहे.

शहरातील गॅस पुरवठादार कंपन्यांच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक जिल्हाधिकार्‍यांनी घेतली. शासनाने ९ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार सर्वप्रथम घरगुती वापरासाठी, त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी आणि शेवटी व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी गॅस पुरवठा केला जाणार आहे, असे स्पष्ट केले. २१ दिवसांनी गॅस नोंदणी करावी असे, या पूर्वीच पुरवठादारांनी ग्राहकांना सांगितले आहे. मात्र गॅस एजन्सीच्या कार्यालयात नागरिकांची बुकिंग क्रमांक प्रत्यक्ष स्वीकारले जात असल्याने काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.

दरम्यान गॅस पुरवठ्यातील मर्यादांमुळे औद्योगिक क्षेत्रात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक उद्योगांसाठी गॅस हा अत्यावश्यक घटक असल्याने पुरवठा वेळेत न मिळाल्यास उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. विशेषतः एलपीजी गॅसवर असलेल्या चारशेहून अधिक लघु व मध्यम उद्योगांना कामकाज बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आयमाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सुमारे दोनशे प्लेटिंग उद्योगांवर त्याचा परिणाम झाला होता. गुरुवारपर्यंत सर्वच्या सर्व ४०० हून प्लेटिंग उद्योग बंद करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या परिस्थितीचा दीर्घकालीन परिणाम कामगार वर्ग तसेच औद्योगिक उत्पादन साखळीवर होण्याची शक्यता असल्याचे आयमाने सांगितले. दरम्यान, प्रशासनाने नाशवंत उत्पादन करणार्‍या उद्योगांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment