होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तरुणांनो लक्ष द्या! रेल्वाच्या लेखी परीक्षेशिवाय २८०१ जागांची भरती सुरू…आयटीआय उत्तीर्णांना मोठी संधी !

On: March 16, 2026 1:34 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी दक्षिण-मध्य रेल्वेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांसाठी तब्बल २८०१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्णांना मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची निवड थेट गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे.

राज्यातील तसेच देशभरातील तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये या भरतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार विविध तांत्रिक ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या कार्यपद्धतीमध्ये तांत्रिक कौशल्याला मोठे महत्त्व असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या माध्यमातून रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या रेल्वेत लेखी परीक्षेशिवाय काळात उमेदवारांना संबंधित कामकाजाची सविस्तर माहिती, उपकरणांचा वापर, तांत्रिक प्रक्रिया आणि कामातील शिस्त याबाबत अनुभव मिळणार आहे.

या भरतीसाठी पात्रता निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या दोन्ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीचा विचार करून अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment