होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जागतिक पुनर्वापर दिन: आरोग्य- पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व आणि उपाय, जाणून घ्या.

On: March 18, 2026 12:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Global Recycling Day: जागतिक पुनर्वापर दिन हा १८ मार्च रोजी साजरा होतो, ग्लोबल रिसायकलिंग फाउंडेशनने २०१८ मध्ये रिसायलिंगचे महत्व लक्षात घेऊन या दिवसाची सुरुवात केली. आपण कचऱ्याकडे कोणत्या दृष्टकोनातून बघतो याला महत्व आहे. कचरा समजून तो फेकणे व पर्यावरणीय महत्त्व बघून तो सुरक्षित पणे नष्ट करणे? हाच खरा प्रश्न आहे. ही जबाबदारी आपली आहेच, पण शासकीय संस्थांच्या स्तरावर ही ती निश्चित आहे. कचऱ्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनेक मार्ग आहे. टाकाऊ वस्तूंचा अनेक वेळा पुनर्वापर करता येतो. पुनर्वापर आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी लाभदायक आहे, कारण आपल्या ऊर्जेचा वापर कमी होतो, आपण श्वास घेत असलेल्या पाण्याची आणि हवेची गुणवत्ता सुधारते, आणि हवामान बदलाचा सामना सक्षमपणे करू शकतो. कचऱ्याकडे कचरा म्हणून नव्हे तर संसाधनाकडे प्रोत्साहन म्हणून पाहण्याची गरज आहे. प्लॅस्टिक प्रदूषण कमी करणे ही काळाची मागणी आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि हवामान बदलाचा सामना करणे अशा आव्हानाचा सामना करण्यास प्रोत्साहन मिळते.

एखादे उत्पादन तयार करून आपली जबाबदारी संपात नाही, याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. वर्तमानपत्रे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांचे डबे, धान्याचे डब्बे आणि दुधाचे वेस्टेज या रोजच्या वापरातील काही सामान्य पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू आहेत. ज्या वस्तू आपण सहसा फेकून देतो, त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, तर आपण पृथ्वीवर आणि आपल्या जीवनावर अधिक सखोल प्रभाव टाकू शकतो.

जागतिक संघटनांनी या दिवसाची सुरुवात यासाठी केली की, पर्यावरण संरक्षण आणि संतुलन राखले जावे.  मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तू प्लॅस्टिक, कागद, काच टाकून न देता त्यांचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे.  दरवर्षी ‘रिसायकलिंग हिरोज सारख्या संकल्पना वापरून लोकांना पुनर्वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे काम होते. पुनर्वापरामुळे नवीन कच्चा माल वापरण्याची गरज कमी होते, ऊर्जा वाचते आणि प्रदूषण कमी करण्यास हातभार लागतो.

ग्रीन गॅसचे उत्सर्जन

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे ही काळाची गरज आहे. आज जगभरातील अनेक शहरे हरित वायूची आगार बनली आहे. कच्च्या मालाचे उत्खनन करून प्रक्रिया करण्यापासून ते उत्पादन आणि वाहतुकीपर्यंत या उत्पादनाच्या जीवनचक्राचा प्रत्येक टप्पा हरितगृह वायू उत्सर्जनास कारणीभूत ठरतो. पुनर्वापर करून, आपण हे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. युरोपियन पर्यावरण संस्थेच्या एका अहवालानुसार, पुनर्वापर केलेल्या प्रत्येक टन सामग्रीमागे पाचशे किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होते, पुनर्वापराच्या योग्य सवयी लावल्यास त्यावर मात करता येते.

जबाबदारीपूर्वक पुनर्वापरासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ई-कचरा हाताळणीदरम्यान बाहेर पडणाऱ्या घातक पदार्थांपासून असुरक्षित गटांचे, विशेषतः मुले आणि गर्भवती महिलांचे संरक्षण करण्यावर भर दिला जातो. प्रमुख पद्धतींमध्ये कचऱ्याचे त्याच्या स्रोतावरच वर्गीकरण करणे, प्लास्टिक, धातूसाठी नेमून दिलेल्या डब्यांचा वापर करणे, उघड्यावर कचरा जाळणे टाळणे आणि सुरक्षित व शाश्वत विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी अधिकृत पुनर्वापरकर्त्यांची मदत घेणे यांचा समावेश आहे.

जागतिक संघटना काय म्हणते?

ई-कचऱ्याबाबत (WHO) जागतिक आरोग्य संघटनेची काही मार्गदर्शक तत्वे आहे. अनौपचारिक ई-कचरा पुनर्वापरामुळे पारा आणि शिसे यांसारखी विषारी रसायने बाहेर पडतात, जी गर्भातील बाळ आणि मुलांसाठी धोकादायक असतात. म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी मुलांना वस्तू वेगळ्या करण्याच्या किंवा पुनर्वापराच्या कामांमध्ये सहभागी करू नये. त्यामुळे माती, पाणी आणि आईच्या दुधाचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे पुनर्वापर मार्गदर्शक तत्वे महत्वाची आहे.

कचरा हा त्याच्या स्रोतावरच वेगळा करणे महत्त्वाचे आहे, प्लास्टिक, कागद, धातू आणि इलेक्ट्रॉनिक्स यासाठी नेमून दिलेल्या डब्यांचा वापर करून स्थानिक संस्था किंवा अधिकृत पुनर्वापर करणाऱ्यांकडे सुपूर्द करा. प्लास्टिक उघड्यावर जाळणे टाळा, कारण त्यामुळे धोकादायक प्रदूषके बाहेर पडतात, त्याचा पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर गंभीर प्रभाव टाकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment