Indians First Talk Film: भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा पहिला बोलपट म्हणजे आलमआरा (जगाचा प्रकाश) हा सिनेमा १४ मार्च १९३१ साली हिंदी भाषेतील चित्रपट आणि भारतातील पहिला बोलपट आहे. मूक चित्रपटाचा एक दीर्घकाळ अनुभवल्यानंतर या बोलपटाविषयी सिनेप्रेमींमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली होती. सिनेसृष्टीत पहिल्यांदाच अशा काही तांत्रिक गोष्टींबाबत जाणून घेण्याचा संधी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळाली. यापूर्वी हातवारे आणि हावभावाच्या सहाय्याने किंवा सांकेतिक भाषने समजून घेण्याची अनुभूती होती, ती ध्वनीच्या आधार मिळाल्याने पडद्यावर आणखी सदाबहार झाली. प्रेक्षकांमध्ये याचे मोठे कुतूहल होते.
या चित्रपटाचे निर्देशन अर्देशीर इराणी यांनी केले. इराणी यांनी चित्रपटसृष्टीत ध्वनीचे महत्त्व ओळखून अनेक समकालीन बोलपटांपूर्वी आलम आरा पूर्ण केला आणि हा चित्रपट १४ मार्च १९३१ रोजी मुंबई (तेव्हाचे मुंबई) येथील मॅजेस्टिक सिनेमात प्रदर्शित केला. या चित्रपटाला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हा पहिला भारतीय बोलपट इतका लोकप्रिय झाला की गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते, तसेच पहिल्यांदा काही आण्याचे तिकीट ५ पाच रुपयांना ब्लॅकने घेतल्याचे ही सांगण्यात येते. लेखन जोसेफ डेव्हिड यांनी केले होते. या चित्रपटात मुंशी जहीर, अभिनेता मास्टर विट्ठल जुबैदा,पृथ्वीराज कपूर आदींनी या काम केले. तर संगीत फ़िरोजशाह मिस्त्री व बहराम ईरानी यांनी दिले होते.
चित्रपट आणि त्याचे संगीत दोन्हीही प्रचंड यशस्वी झाले. “दे दे खुदा के नाम पर” हे गाणे, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे होते आणि चित्रपटात फकीरची भूमिका साकारणारे अभिनेता वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते, ते खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यावेळी भारतीय चित्रपटांमध्ये पार्श्वगायन सुरू झाले नव्हते, म्हणून हे गाणे हार्मोनियम आणि तबला संगीताच्या साथीने थेट रेकॉर्ड केले अन् आज ही त्याची आठवण जुने जाणते सांगतात.
या चित्रपटाने भारतीय चित्रपटांमध्ये चित्रपट संगीताचा पायाही घातला. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रतिक्रिया ही महत्त्वाची होती. चित्रपटाबद्दल बोलतांना बेनेगल म्हणाले, हा फक्त एक बोलका चित्रपट नव्हता, तर कमी बोलणारा आणि जास्त गाणारा बोलका आणि गाणारा चित्रपट होता. चित्रपटात अनेक गाणी होती आणि चित्रपटांमध्ये गाण्यांद्वारे कथा सांगण्याची किंवा वाढवण्याची परंपरा सुरू झाली.
या चित्रपटाने त्याकाळी ५० हजार रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. तो एक रेकॉर्ड होता. त्यानंतर अनेक चित्रपट आले, आणि बोल चित्रपटाचे नवे पर्व देखील सुरू झाले. १४ मार्च १९३१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ९५ वर्ष पूर्ण झाले. म्हणून १४ मार्च हा बोलपट दिन म्हणून आठवण ठेवली जाते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा या ऐतिहासिक चित्रपटाविषयी स्मृती जाग्या झाल्या.










