होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold Silver Rate Today : ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या जळगावात नवे दर काय?

On: March 12, 2026 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold Silver Rate Today : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपुर्ण जगावर दिसून येत आहे. पेट्रोल-डिझल, गॅसचे दर वाढले आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांसाठी सोनं आवाक्याबाहेर गेले आहे. अशात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदविण्यात आली. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट दिसून आली.

आजचे सोने-चांदिचे दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी बाजारपेठ उघडल्यावर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 721 रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 65 हजार 109 रुपयांपर्यंत खाली आले.

तर चांदी दरात प्रति किलो 7210 रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 2 लाख 75 हजार 010 रुपयांपर्यंत घसरले.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. या युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेल, गॅससह सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातुंच्या बाजारावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू सतत वाढ होणाऱ्या सोने-चांदिच्या दरात आज घसरण नोंदविण्यात आली. ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक याकडे वळताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment