होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Nashik News: नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यास मनसेचा विरोध!

On: April 3, 2026 6:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाविरोधात मनसेने तीव्र विरोध केला आहे. मनसेतर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना निवेदन दिले.मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश भोई, मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, शहर उपाध्यक्ष नितीन पंडित, मनविसे उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, सदस्य शशी चौधरी, संदीप आहेर, अमर जमधडे आदी उपस्थित होते.

निवेदनाचा आशय असा, नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नाशिक रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव महासभेने चर्चा न करता मंजूर केला असे समजते. रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे सर्व अधिकार रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे आहेत. महापालिकेने असा प्रस्ताव मांडणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. नाशिक रोड ही या परिसराची ऐतिहासिक ओळख आहे. ब्रिटीश काळापासून हे नाव प्रचलित असून, देशभरातील प्रवाशांच्या मनात या नावाने घर केले आहे. नाव बदलल्यामुळे रहिवाशांच्या भावना दुखावून उद्रेक होऊ शकतो. प्रशासनाचा असा युक्तिवाद आहे की, नाशिक रोड नावाने बाहेरील प्रवाशांचा संभ्रम होतो. मात्र, नाव बदलल्याने गोंधळ वाढू शकतो. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर अधिक माहिती फलक लावणे किंवा उद्घोषणा अधिक स्पष्ट करणे हे पर्याय प्रभावी ठरू शकतात.

महापालिकेने नावाच्या वादात शक्ती खर्च करण्यापेक्षा नाशिक रोड परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक कोंडी, खड्डे यांकडे लक्ष द्यावे. निधी वाटपात सत्ताधा-यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांशी दुजाभाव केला आहे. त्यामुळे हा अन्याय नाशिक रोडकर सहन करणार नाही. नाशिक रोड नामकरणाचा प्रयत्न बंद करावा.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment