होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिकमध्ये ढोल ताश्यांचा गजरात ‘महावादन’; २५ ढोल पथकांचे जोशपूर्ण सादरीकरण

On: March 16, 2026 4:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले होते . शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जोशपूर्ण वादन सादर केले. ढोल पथकाच्या वादनाने परिसर दणाणून सोडला. नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नववे गुरु  तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्षानिमित्त समर्पित कार्यक्रम झाला.

भव्य अशा महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले होते. शहरातील विविध भागांतील २५ ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. नाशिक ढोल पथक महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे. सण उत्सव कोणताही असो नाशिकचे ढोल पथकाला आवर्जून बोलावले जाते. २५ ढोल पथकाच्या कलाकारांनी वादन करून नाशिककरांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने कलाकार प्रवीण तरटे उपस्थित होते. त्यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आडकेआहेर, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनिषा खत्री तसेच स्थायी समिती अध्यक्ष  मच्छिंद्र सानप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदारडे, चंद्रशेखर जोशी, प्रफुल्ल संचेती व समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्व ढोल पथकांनी सादर केलेल्या जोशपूर्ण वादनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा महावादन कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात उत्साहात पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment