होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! स्मार्ट ॲग्री सोल्यूशन्समध्ये AI तंत्रज्ञानाचा होणार वापर

On: March 12, 2026 2:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Smart Agri Solution: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषी व्यापार आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची कंपनी पल्सर इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, कंपनी आता आपल्या स्मार्ट ॲग्री सोल्यूशन्समध्ये आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पल्सर इंटरनॅशनल प्रामुख्याने ताजी फळे आणि भाजीपाला यांच्या प्रक्रिया आणि वितरणात कार्यरत आहे. आता AI आणि IOT च्या प्रवेशामुळे कंपनी कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज झाली आहे.

कंपनीने डिसेंबर 2025 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 4 पटीने वाढून 3.29 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात 66 लाख रुपये होता. तसेच, कंपनीच्या महसुलात तब्बल 530 टक्क्यांची वाढ होऊन तो 39.64 कोटी रुपयांवर गेला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दोन मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. AI आणि IOT विस्तार करण्यात येणार असून स्मार्ट ॲग्री सोल्यूशन अंतर्गत नवीन तंत्रज्ञान राबवण्यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचबरोबर कंपनी आपल्या राखीव निधीतून 100 टक्क्यांपर्यंत मध्यंतरी लाभांश देण्याची शिफारस करू शकते. यासाठी रेकॉर्ड डेट देखील याच बैठकीत जाहीर होईल.

कंपनीने आपल्या विस्तार योजनांसाठी डिसेंबर 2025 मध्ये 35.70 कोटी रुपयांचा राईट्स इश्यू यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या निधीचा वापर कोल्ड स्टोअरेज उभारणी, कंत्राटी शेती आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जात आहे.

 

तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना होईल लाभ

शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढवण्यासाठीच नाही, तर मालाची ने-आण, पारदर्शकता आणि साठवणुकीसाठी AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. यामुळे पिकांचे नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पल्सर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद परमार यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment