होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतकऱ्यांनो रब्बीचे पिके सांभाळा: अवकाळीचा मुक्काम वाढला, राज्यात ‘इतके’ दिवस वादळी पाऊस..

On: March 29, 2026 2:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यात दोन दिवस पाऊस पडणार असा अंदाज होता, मात्र आता अवकाळीचा मुक्काम वाढणार आहे. उकाड्याने नागरिक आताच हैराण झाले आहे. ३० मार्चपासून राज्यात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल असे दिसते. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीचे पिके वाचवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.असा अंदाज असल्याचे कृषी विभागाने सांगितले. त्यानंतर ही वादळी पाऊसासह गारपिटीची देखील शक्यता वर्तविले दि. १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: बोधगया यात्रेला जाताय, मग ‘या’ दिवशी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे होणार प्रस्थान

प्रवाश्यांच्या खिशाला झळ: एसटीची १३ टक्के भाडेवाढ

राज्यातील SIR ला मुदतवाढ: मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; तारखा अशा ‘ते’जाणून घ्या

Car-Dumper Accident : लग्नानंतरच्या पहिल्याच प्रवासात सात जन्माची गाठ सुटली, कार-डंपरच्या अपघातात नवविवाहितेसह चौघे ठार

Rain Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात पुढील 4-5 दिवसात तुरळक स्वरुपाचा पाऊस; 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार

तीन वर्षात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र; रेल्वे पायाभूत विकासाबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment