होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावकरांसाठी खूशखबर ! म्हाडाकडून जळगाव–ममुराबाद रोडवर १४४ घरांची इमारत राहणार उभी; हालचाली गतीमान

On: March 14, 2026 4:30 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हाडातर्फे ममुराबाद रस्त्यावर १४४ घरांची सहा मजली इमारत उभारली जाणार आहे. ३१ गुंठे शासकीय भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारला जात असून निविदा प्रक्रिया लवकरच काढली जाणार आहे.

जळगाव शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहे. त्यासाठी शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावर सुमारे ३१ गुंठे शासकीय जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल १४४ कुटुंबांसाठी सहा मजली निवासी इमारत उभारण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी निवासाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने म्हाडाने पावले उचलली आहेत. जळगाव शहरात पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी पुरेशा जागेची जी अडचण होती ती दूर झाली असून जिल्हा प्रशासनाने शहराजवळ ममुराबाद रोडवरील शासकीय भूखंडाचा निवड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यासाठी जमीन उपलब्ध नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, मात्र या नव्या जागेमुळे ते स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गट क्रमांक ४२०/अ मधील १५ गुंठे आणि गट क्रमांक ४२१/अ मधील १६ गुंठे असे एकूण सुमारे ३१ गुंठे क्षेत्र गृहनिर्माण व क्षेत्र हस्तांतरणानंतर म्हाडाकडून पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाला गती देण्यात आली असून निविदा प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून, निविदा पूर्ण झाल्यानंतर घरांच्या किंमती निश्चित करून सोडत काढण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment