LPG Shortage: महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे, घरगुती गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तसेच घरगुती गॅस सिलिंडरसाठी देखील रांगा लागल्याची परिस्थती आहे. केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात माहिती दिली आहे.
गॅस पुरवठा हा विषय केंद्राचा विषय आहे, आणि केंद्राने सांगितलं आहे की, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात एलपीजी आणि पीएनजीचा साठा आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नसून कुठेही रांगा लावणे आणि गॅसचा काळाबाजार होणार नाही, आम्ही जिल्हाधिकारी, एसपी आणि इत्तर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या यांच्या कमिट्या नेमल्या आहे, या कमिट्याच्या माध्यमातून काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आम्ही एकूण तेवीस गुन्हे दाखल केले असून १८ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
पुढे बोलताना भुजबळ यांनी म्हटलं की, गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती या ८५२.५० रुपये एवढ्या होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन त्या ९१२.५० रुपये एवढ्या झाल्या आहेत. तर व्यावसायिक सिलिंडर १७२०.५०.रुपयांवरून १८३५ रुपयांवर पोहोचले आहे. मी प्रमुख गॅस वितरण कंपन्या, डीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल या प्रमुख कंपन्यांशी बोललो आहे. आहेत, त्यांना ९ हजार मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे.











