होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची मेगाभरती, असा करा अर्ज

On: March 13, 2026 7:02 PM
Follow Us:
---Advertisement---

MSRTC ST Recruitment 2026: राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच मेगाभरती केली जाणार आहे. एसटी महामंडळामध्ये 17 हजार 742 पदांची मेगाभरती होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाpost बतची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ अधिक सक्षम आणि आहे करण्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन बस खरेदी करण्याचे धोरण राबवले जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच या नव्या बस सेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एसटी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या ताफ्यात वाढणाऱ्या बसेसच्या तुलनेत मनुष्यबळाची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी लवकरच १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

​एसटी महामंडळाची सेवा अधिकलोकाभिमुख करण्यासाठी व प्रवाश्यांना अधिक दर्जेदार सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने एसटी मध्ये अनेक रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. परिवहन विभागाने या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे, २०२२ च्या ऐतिहासिक संपादरम्यान एसटीची चाके धावती ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली, त्यांना या भरती प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे सरकारचा कल आहे.

​संपाच्या काळात एसटीकडे केवळ १२,५०० बसेस होत्या. आता १४,००० हून अधिक बसेस ताफयात आहेत. त्यातच दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून ८ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ३ हजार बसेसचे टप्प्याटप्प्याने समावेश होणार आहे. ही वाढती संख्या पाहता चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज ओळखून ही ‘मेगा भरती’ युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

भोंदू खरातने राजकीय ओळखीचा फायदा कशासाठी घेतला का? सीडीआरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leave a Comment