होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Iran War Update: अमेरिकेकडून युद्ध जिंकल्याचा दावा; पण इराण अन् इस्त्रायलला काय वाटते?

On: March 12, 2026 1:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Iran War Live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम जगावर जाणवू लागला आहे. या युद्धाचा 13 वा दिवस आहे, या युद्धाच्या झळा सर्व देशांना सोसाव्या लागतील. युद्धाबाबत अमेरिका-इस्रायल आणि इराणकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे, असा दावा केला आहे. परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. अमेरिकेच्या सैन्याने इराणची ताकद संपवल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. त्यांनी केंटकी येथील एका सभेत बोलतांना ही माहिती दिली.

इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी सांगितले की, युद्ध संपवण्यासाठी तीन अटी आवश्यक आहेत, इराणचे कायदेशीर हक्क मान्य केले पाहिजेत, युद्धातील नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि भविष्यात पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी दिली पाहिजे. मात्र, दुसरीकडे इस्त्रायलने आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही. अमेरिकेला ही भूमिका मान्य असेल का? असा ही प्रश्न उपस्थित होतो. संरक्षण विभागाने, पेंटागॉनने संसदेला माहिती दिली की, अमेरिकेने अंदाजे ११.३ अब्ज डॉलर्स खर्च केले. यापैकी अंदाजे ५ अब्ज डॉलर्स शस्त्रे आणि दारूगोळ्यावर खर्च केल्याचे सांगितले.

तेलाच्या किमतीत होणार वाढ

अमेरिका -इस्त्रायल-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता असून तसा इशारा इराणने दिला आहे. झोल्फाकारी म्हणाले की इराण अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांपर्यंत तेल पोहोचू देणार नाही. त्यांच्या मते, इतर देशांकडे जाणारे कोणतेही तेलवाहू जहाज किंवा टँकर हे कायदेशीर लक्ष्य केले जातील व विरोधकांवर सातत्याने आमची नजर असून त्यांच्यावर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा ही दिला आहे.

या युद्धात इराकच्या सागरी हद्दीत तेल टँकरवर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सफेसी विष्णू नावाच्या तेल टँकरवर हल्ला करण्यात आला. हे जहाज एका अमेरिकन कंपनीचे होते आणि मार्शल बेटांच्या ध्वजाखाली प्रवास करत होते. हा हल्ला खोर अल जुबैर बंदराजवळ झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ल्यासाठी एका आत्मघातकी बोटीचा वापर करण्यात आला. त्यातील उर्वरित २७ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आणि नंतर त्यांना बसरा शहरात नेण्यात आले.

सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०१ डॉलर्सवर

काल ९२ डॉलर असलेल्या तेलाच्या किंमती आता आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल १०१ डॉलर्सच्यावर गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या ३२ देशांनी बाजारात ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात आणण्याची योजना आखली असून त्यामुळे ही वाढ झाली आहे, परंतु असे असले तरी तेलाबाबत अनेक देशांची चिंतासंपल्या नाहीत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत शिपिंगमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेतील चिंता वाढल्याचे जाणकारांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

Leave a Comment