Health Tips: सकाळी-सकाळी काही पोषक कडधान्य खाल्यास त्याचा आरोग्याला चांगला फायदा होते. खास करून रात्रभर पाण्यात भिजवलेले मूग आरोग्याला विशेष लाभदायक ठरतात. मोड आलेल्या मूगात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आसतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. सकाळी चहा घेण्यापूर्वी अंकुरित मूग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले ज़ाते. चला तर मग जाणून घेऊया मोड आलेल्या मूगाचे सेवन केल्याने आरोग्यास काय लाभ होतो.
सकाळी जो काही नाश्त्याचा पर्याय तुम्ही निवडता, त्यात आरोग्यवर्धक आहाराला प्राधान्य द्या, दिवसभर एनर्जी टीकून ठेवण्यासाठी सकाळी मोड आलेले अंकुरित आहार घेणे चांगले आहे. जुनी जाणती मंडळीं आज ही अशा गोष्टींचा अवलंब करतांना आढळतात. आजीचा बटवा सर्वाना परिचित आहेच, आपल्या लहानपाणी आजीने मोड आलेल्या कडधान्याचे काही फायदे सांगिलेले आहेत. सकाळी सकाळी चहा, कॉफीचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही, त्यामुळे अपचन, गॅस अश्या समस्या उद्भवतात. अशात मूग हे एक सुपरफूड असून मोड आलेल्या मुगामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मोड आलेल्या मुगाचे ‘हे’ आहेत फायदे
पचन सुधारते
सकाळी इतर जड आहार घेण्यापेक्षा हलका आहार घ्यावा. यात पोटासाठी अंकुर आलेले धान्य चांगले. मुगामुळे शरिरात फायबरचे प्रमाण वाढते. तुमची चयापचय क्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळता येतात. मुगामध्ये असलेले एन्झाइम्स आहार पचण्यास मदत करतात.
वजन कमी होणे
वजन कमी करण्यासाठी मूगाचे सेवन आश्चर्यकारक लाभ देते. मोड आलेल्या मूगाचा आहारात समावेश करा, रोज ना चुकता काही प्रमाणात त्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यास मदत होते. जेवणात प्रथिने आणि फायबरच्या समावेशामुळे अपचन सारखे पोटाचे आजार दूर करण्यास मदत होते. त्यामुळे मोड आलेले मूग आपल्या आहारात अवश्य घ्या.
आरोग्यासाठी पोषकतत्व
विना अंकुरीत मूग हे तेवढे आरोग्याला फायदा देता नाही, त्यामुळे शक्यतो चांगल्या पोषक आहारासाठी मोड आलेलेच मूग खाणे महत्वाचे आहे. मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे मुगामधील जीवनसत्त्वे आणि खनिजांची क्षमता अनेक पटींनी वाढते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते. याव्यतिरिक्त, त्यातील लोहाचे प्रमाण ॲनिमियाशी लढण्यास मदत करते आणि प्रथिने स्नायूंना मजबूत करतात.
हृदयाचे आरोग्य राहते चांगले
अंकुर आलेले मूग शरिरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. यासह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मोड आलेले मुग लाभदायक ठरते.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )











