होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: शिवसेना उबाठा गट आक्रमक; डोळ्याला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालसासमोर अनोखे आंदोलन !

On: March 17, 2026 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी डोळ्याला अन तोंडावर काळी पट्टी बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. गॅस तुटवडा आणि वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

गॅस बुकिंगनंतर लागणारा कालावधी कमी करावा. गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर अवघ्या ४ दिवसांत सिलिंडर घरपोच मिळणे बंधनकारक करावे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे व शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांनी केली आहे. यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गॅस ग्राहकांसाठी मोठा दिलासा दिला असून ९६ तासाचा तसाच नियम येथे लागू करावा, गॅस सिलिंडर दरवाढ तसेच अघोषित तुटवडा तत्काळ दूर करण्यासाठी उपाय योजना कराव्यात.

युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून दर वाढले आहे. महाराष्ट्र सरकारने जळगांव जिल्ह्यातील तसेच राज्यातिला इतर भागातील गॅस सिलिंडर टंचाई दूर करावी व साठेबाजी रोखण्यासाठी प्रयत्न करावा. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करून दरवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करणार येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जळगांव ग्रामीणचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह शिवसेना जळगांव तालुका प्रमुख प्रमोद घुगे, योगेश चौधरी, प्रेमराज राठोड, योगेश पाटील डॉ.रमाकांत कदम,भगवान धनगर, किरण ठाकूर, भीमराव पांडव, प्रमोद सोनवणे, प्रसाद पाटील,सचिन चौधरी, प्रदीप पाटील, अशोक पाटील, रामदास कोळी, खुशाल अहिरे, महेश अहिरे, शांताराम उशिर आदी उपस्थित होते.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment