Astronot kalpana chavla: भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावलाचा यांचा जन्म १७ मार्च १९६२ साली हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्या एक अमेरिकन अंतराळवीर आणि एरोस्पेस अभियंता होत्या, तसेच अंतराळात उड्डाण करणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या. चावला यांना लहानपणापासूनच एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये आवड होती, त्यांनी भारतातील पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या, जिथे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, आर्लिंग्टन येथून एमएससी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो, बोल्डर येथून पीएचडी मिळवली. त्यानंतर १९९० ला त्या अमेरिकेच्या नागरिक झाल्या.
१९८८ मध्ये, चावला यांनी नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जिथे त्यांनी सुरुवातीला व्हर्टिकल आणि शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग (V/STOL) संकल्पनांवर कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स संशोधन केले. त्यानंतर त्यांनी द्रव प्रवाहाच्या समस्या सोडवण्यासाठी संगणकांचा वापर कसा करायचा याचा अभ्यास केला आणि पॉवर्ड लिफ्ट इफेक्ट्सची गणना करून या पद्धतींची चाचणी केली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्या अमेरिकेच्या नागरिक झाल्या,
चावला १९९३ मध्ये लॉस अल्टोस, कॅलिफोर्निया येथील ओव्हरसेट मेथड्स येथील संशोधन संस्थेत संशोधन शास्त्रज्ञ आणि संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या. त्यांनी काम हलणाऱ्या वस्तूंच्या समस्यांचे निराकरण करणे काम करण्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच लॉस अल्टोसमध्ये असताना, त्या पालो अल्टो विमानतळावरील वेस्ट व्हॅली फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाल्या, उड्डाण करण्याचा अनुभव ही घेतला. सॅन जोस येथील डान्स संस्थेकडून भरतनाट्यम त्या शिकल्या आहेत.
डिसेंबर १९९४ मध्ये, ती नासा एस्ट्रोनॉट ग्रुप १५ चा भाग झाली. आणि जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी नासामध्ये पुन्हा परतली, अखेरीस १९९५ मध्ये तिला नासा एस्ट्रोनॉट कॉर्प्सच्या इव्हीए आणि रोबोटिक्स विभागात तिची नियुक्ती झाली. त्या १९९७ मध्ये स्पेस शटल कोलंबियाच्या एसटीएस-८७ या अंतराळ मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून रुजू झाल्या. येथूनच पहिल्या उड्डाणाची संधी मिळाली. मात्र या दरम्यान त्या शटल-पॉइंटेड ऑटोनॉमस रिसर्च टूल फॉर ॲस्ट्रॉनॉमी (“स्पार्टन”) मॉड्यूल तैनात करण्यात अयशस्वी झाल्याने तिच्या या उड्डाणातील भूमिकेमुळे काही वाद निर्माण झाला होता.
मात्र उड्डाणाची संधी हुकल्यावर, चावला यांचे दुसरे उड्डाण २००३ मध्ये १०७ वर झाले, जे कोलंबियाचे अंतिम उड्डाण होते. १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना स्पेस शटल कोलंबियाचे तुकडे होऊन जळाले, या दुर्घटनेत त्यांचे मरण पावलेल्या सात क्रू मेंबरपैकी ती एक होती. तिचे असे जाणे सर्व भारतातील नागरिकांच्या मनाला चटका लावून गेले. चावला यांना मरणोत्तर काँग्रेस स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेडलने सन्मानित करण्यात आले. अनेक इमारती, अंतराळयाने आणि बाह्य अवकाशातील महत्त्वाच्या स्थळांना त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात आले आहे.
चावला यांचा अंतराळातील ३१ दिवसांचा कालावधी
कल्पना चावला यांचा अंतराळातील कालावधी ३१ दिवस १४ तास ५४ मिनिटे होता, नासा ग्रुप १५ (१९९४) मोहिम आणि एसटीएस-८७, एसटीएस-१०७ या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. ४० वर्षाची थक्क करणारी कारकीर्द ही सर्व भारतातील एरोस्पेस क्षेत्रातील युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे.










