होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महागाईत खाद्यतेलाच्या दरवाढीची फोडणी; सर्वसामान्य मेटाकुटीस !

On: March 17, 2026 6:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Cooking Oil Price Hike: युद्धाने सर्वसामान्याच्या जीवनावर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे, महागाईचा दर ही वाढला, तसा महागाईचा अनुभव येत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर पडू लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले असतांना आता खाद्यतेलाने ही सर्वसामान्यांचे बजेट बिघडवले आहे.

महागाईचा दर वाढला असून जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील वाढले आहे. त्याचा परिणाम आता घरच्या बजेट वर पडू लागला आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरनंतर खाद्यतेलाची दर वाढले आहे. त्याचा परिणाम हा गृहिणींचे बजेट बिघडले आहे. खाद्यतेलाचे दर १५ ते २० रुपयांनी वाढले आहे.

गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तब्बल १३ ते १८ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ अधिकच जाणवू लागली आहे. अमेरिका -इस्रायल- इराण युद्ध सुरू झाले तेव्हापासून दर भडकण्यास प्रारंभ झाला. फेब्रुवारी अखेरीस १६० रुपये असलेले सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांवर पोहोचले आहे. घाऊक बाजारातही १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

खाद्यतेलाचा प्रकार आणि अंदाजे किंमत (प्रति. लिटर/किलो)

शेंगदाणा तेल – १९० – १९४ रु
सूर्यफूल तेल १७३ – १७८ रु.
सोयाबीन तेल – १५३ – १५९ रु.
पाम तेल – १४५ – १४८ रु.
मोहरी तेल – २०० – २०४ रु.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment