Iran Ultimatum : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष चांगलाच पेटला आहे, युद्धाने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ठार झाल्याची अफवा असून इस्त्रायलने या अफवेचे खंडन केले आहे. तर इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने नेतान्याहू जिवंत असतील तर त्यांना शोधून ठार करू असा इशारा दिला आहे. दुसरीकडे अमेरिका-इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीला लागले आहे. तर इराणने देखील जोरदार पलटवार करण्याच्या इशारा दिला आहे.
सोशल मीडियात १३ मार्चला नेतान्याहूंचा एक व्हिडिओ संदेश समोर आला. त्यात नेतान्याहू ठार झाल्याचा दावा काही सोशल मीडिया वापरर्त्यानी केला मात्र, हा दावा काहींनी फेटाळला तो ‘एआय’ निर्मित फेक व्हिडिओ असल्याचा दावा काहींनी केला होता. त्यानंतर असे दावे करण्यात आले की नेतान्याहू इराणी हल्ल्यात मारले गेले आहेत किंवा जर्मनीला पळून गेले, मात्र इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून पंतप्रधान सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहे.
तसेच इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी सुरक्षित असल्याचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने स्पष्ट केले आहे. एका ब्रिटिश वृत्तसंस्थेने ते जखमी झाल्याचे वृत्त दिले होते, इराणने ते फेटाळून लावले आहे. ट्रम्प यांनीही मुजतबा जखमी झाल्याचे म्हटले होते. परंतु परराष्ट्रीय मंत्रालयाने हे दावे फेटाळून लावले आहेत. इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांवर हल्ले सुरूच ठेवले आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई) च्या अल-धफ्रा या अमेरिकन हवाई तळावर हल्ला करून सैन्यांला लक्ष्य केले. IRGC ने म्हटले आहे की, हल्ल्यात दहा मिसाईल,आणि ड्रोनचा वापर करून . त्यात लष्करी फॅसिलिटीला टार्गेट करण्यात आले. तसेच हवाई रक्षा प्रणालीचा देखील समावेश आहे.
अमेरिका-इस्रायल हे इराणवर सर्वशक्तीनिशी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अमेरिकन नौदलाला तसे निर्देश देण्यात आल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, आता अमेरिकन सैन्य इराणच्या आजूबाजूच्या परिसराला वेढा टाकण्यासाठी व्यूहरचना आखत आहे. आतापर्यंत इराणच्या शेकडो शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. आता त्याहून मोठा हल्ला करण्याचा इशारा अमेरिकेने इराणला दिला. युद्धाला आता तीन आठवडेपूर्ण झाली आहे. तरी हा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत येत नाही, या युद्धाची झळ आता जगाला बसू लागली आहे.










